नवी दिल्ली : जगासह देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात पहिल्यांदाच देशात 400 पेक्षा जास्त बळी कोरोनामुळं गेले आहेत. 24 तासात 445 बळींची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 821 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 26 हजार 910 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 37 हजार 252 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 55.77 टक्के आहे. वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार सध्या कोरोनाची लागण असलेले 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 440 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या 13 हजार 703 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 132075  इतका झाला आहे. 65744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. तर आतापर्यंत 6170 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 59377 रुग्ण, 32754 बरे झाले, मृतांचा आकडा 757

दिल्ली  59746 रुग्ण, 33013 बरे झाले, मृतांचा आकडा 2175

गुजरात  27260 रुग्ण, 19349 बरे झाले,  मृतांचा आकडा 1663

राजस्थान  14930 रुग्ण, 11597 बरे झाले, मृतांचा आकडा 349

मध्यप्रदेश 11903 रुग्ण, 9015 बरे झाले, मृतांचा आकडा 515

उत्तरप्रदेश 17731 रुग्ण, 10995 बरे झाले, मृतांचा आकडा 550

प.बंगाल 13945 रुग्ण, 8297 बरे झाले, मृतांचा आकडा 555

जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे  90 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मागील 54 तासात 3338 जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. तर एक लाख तीस हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 90 लाख 45 हजार 457 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख  69 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 48 लाख 33 हजार 574 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 62 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित अमेरिका:   कोरोनाबाधित - 2,356,655     मृत्यू- 122,247 ब्राझिल:      कोरोनाबाधित - 1,086,990    मृत्यू- 50,659 रशिया:          कोरोनाबाधित - 584,680        मृत्यू- 8,111 भारत:        कोरोनाबाधित - 426,910        मृत्यू- 13,703 यूके:          कोरोनाबाधित - 304,331        मृत्यू- 42,632 स्पेन:          कोरोनाबाधित - 293,352        मृत्यू- 28,323 पेरू:          कोरोनाबाधित - 254,936        मृत्यू- 8,045 चिली:        कोरोनाबाधित - 242,355        मृत्यू- 4,479 इटली:        कोरोनाबाधित - 238,499        मृत्यू- 34,634 इराण:        कोरोनाबाधित - 204,952        मृत्यू- 9,623