Coronavirus Prevention : देशात कोविड विषाणू (Covid19 Updates) संसर्ग अजूनही सुरुच आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंट समोर येत असून व्हायरसच्या म्युटेशनवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. काळानुसार, कोरोना व्हायरस अधिक धोकादायक होत आहे. दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार आणि आरोग्य प्रशासन चिंतेत आहे. आरोग्य मंत्रालयाने कोविडपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.


बचावासाठी 'या' चार T अवलंब करा


भारतात दररोज सुमारे 1500 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. देशात 25 मार्च रोजी 1590 प्रकरणांची नोंद झाली. गेल्या 146 दिवसांतील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या 9 पटीने वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट- टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.


नव्या कोविड मार्गदर्शक सूचना


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, पाच दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. बॅक्टेरियल एन्फेक्शन (Bacterial Infection) म्हणजेच व्हायरल फ्लू झाल्याची शंका असल्यास अँटीबायोटीकचा वापर करू नये. मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर राखा, शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हलचे निरीक्षण करा, या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.


XBB 1.16 देशात वाढता प्रसार


डॉक्टरांच्या मते, सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रसार हा XBB 1.16 व्हेरियंटमुळे आहे. कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा XBB 1.16 चा प्रसार वेगाने होतो. तसेच हा व्हेरियंट इतर प्रकारांच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्यास यशस्वी ठरतो. त्यामुळे लोकांना याचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.


अनेक लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत


XBB 1.16 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. लक्षणं नसणं हे डॉक्टरांसाठी चिंताजनक आहे. लक्षण दिसत नसल्यामुळे असे कोरोनाबाधित रुग्ण इतर लोकांना जास्त संक्रमित करू शकतात. यामुळे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Corona Guidelines : पुन्हा कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी, 'या' गोष्टींची काळजी घ्या