India Corona Cases : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, अद्यापही धोका टळलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यात घट होत असली तरी, मृतांचा आकडा फारसा कमी झालेला नाही. देशात तब्बल 80 दिवसांनी 60 हजाराहून कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1576 बाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 60 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात 87,619 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


देशात सलग 38व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 19 जूनपर्यंत देशभरात 27 कोटी 66 लाख 93 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 38 लाख 10 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटींहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 98 लाख 81 हजार 965
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 87 लाख 66 हजार
एकूण सक्रिय रूग्ण : 7 लाख 29 हजार
एकूण मृत्यू : 3 लाख 86 हजार 713


राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू


राज्यात काल 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,373 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,10,356 इतकी झाली आहे. काल 257 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,32,597 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासांत 696 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 13 मृत्यूंची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजवर 688340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14,751 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :