Independence Day 2022 PM Modi Speech : आज देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन... संपूर्ण देशभरात आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष आहे. सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. यावेळी प्रथमच पहिल्यांदा स्वदेशी तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन केली. आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून दीड तासांचं भाषण करत सर्वाधिक वेळ भाषण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्यामुळे यावेळी मोदी पुन्हा सर्वाधिक वेळ भाषण करुन विक्रम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अशातच मोंदींनी देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं भाषण केलं. 

15 ऑगस्टला पंतप्रधान लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भाषण 72 मिनिटं चाललं. त्यानंतर सर्वात लांबलेलं भाषण होतं ते नरेंद्र मोदी यांचं 2016 साली. नरेंद्र मोदी सर्वाधिक 94 मिनिटं बोलले होते. 2014 पासून मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात तीन वेळा 90 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बोलले आहेत. 2017 साली ते सर्वात कमी म्हणजे 56 मिनिटं बोलले होते. तर 2018 मध्ये 83 मिनिटं, 2019 मध्ये 92 मिनिटं, 2020 मध्ये 90 मिनिटं, तर 2021 मध्ये 88 मिनिटांचं भाषण पंतप्रधान मोदींनी केलं. 

ल्या काही वर्षात कोणत्या पंतप्रधानांच भाषण किती वेळ चाललं?

वर्ष पंतप्रधान  भाषणाचा कालावधी
2002 अटलबिहारी वाजपेयी 25 मिनिटं
2003 अटलबिहारी वाजपेयी 30 मिनिटं
2004 मनमोहन सिंह  45 मिनिटं
2005 मनमोहन सिंह  50 मिनिटं
2006 मनमोहन सिंह  50 मिनिटं
2007 मनमोहन सिंह  40 मिनिटं
2008 मनमोहन सिंह  45 मिनिटं
2009 मनमोहन सिंह  45 मिनिटं
2010  मनमोहन सिंह  35 मिनिटं
2011 मनमोहन सिंह    40 मिनिटं
2012 मनमोहन सिंह    32 मिनिटं
2013  मनमोहन सिंह    35 मिनिटं
2014 नरेंद्र मोदी  65 मिनिटं
2015  नरेंद्र मोदी  88 मिनिटं
2016 नरेंद्र मोदी  94 मिनिटं
2017 नरेंद्र मोदी  56 मिनिटं
2018 नरेंद्र मोदी  83 मिनिटं
2019 नरेंद्र मोदी  92 मिनिटं
2020 नरेंद्र मोदी  90 मिनिटं
2021 नरेंद्र मोदी  88 मिनिटं
2022 नरेंद्र मोदी  82 मिनिटं

पंतप्रधान मोदी भाषणात काय म्हणाले? 

बलिदान देणाऱ्यां प्रति नतमस्तक होण्याची संधी : पंतप्रधान मोदी 

भारतातील असा एकही कोपरा नव्हता, असा कोणताही काळ नव्हता, जेव्हा देशवासियांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही, आपले आयुष्य पणाला लावलं नाही, यातना सहन केल्या नाहीत, बलिदान दिलं नाही. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

'मेड इन इंडिया' मोहिमेला चालना

देशाला आत्मनिर्भर बनण्याची गरज आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मेड इन इंडिया मोहिमेला चालना मिळाली आहे. यंदा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती वेळी स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली. आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश जगाला भारताची ताकद दाखवणं आहे. जागतिक बाजारात स्वदेशीला स्थान मिळवून देणं आपलं ध्येय असेल.', असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :