मॉस्को : रशियातून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या (HAL) प्लांटमध्ये रशिया भारतासोबत सुखोई 30 (Sukhoi 30) निर्मिती करण्याची शक्यता असल्याची माहिती रशियाच्या शासकीय वृत्तसंस्थेतील सूत्रांकडून मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir Putin) यांच्या रशियातील भेटीनंतर नाशिकला मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. 


नाशिकमधील (Nashik) हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या प्लांटमध्ये रशिया भारतासोबत सुकोई ३० निर्मिती करण्याची शक्यता आहे. भारत आणि रशिया संयुक्तपणे जागतिक निर्यातीसाठी Su-30 जेटची निर्मिती करू शकतात. मॉस्कोमध्ये मोदी-पुतिन भेटीच्या वेळी स्फुटनिकाला मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मिग-21 साठी ओळखला जाणारा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना हा निर्यातीसाठी नवीन Su-30s तयार करण्याची शक्यता आहे.  Su-30  हे लढाऊ विमान मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील हवाई दलांद्वारे वापरले जाते. आता भारत आणि रशिया संयुक्तपणे नाशिकमध्ये या विमानाची निर्मिती करण्याही शक्यता आहे. 


एचएएलमध्ये लढाऊ विमानांची निर्मिती सुरू करण्यासाठी चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशियाच्या नुकत्याच भेटीनंतरच्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, दोन्ही देशांनी रशियन वंशाच्या शस्त्रास्त्रांच्या भागांचे उत्पादन, दुरुस्ती आणि देखभाल करण्याच्या दिशेने काम करण्यास सहमती दर्शविली आहे. रशियन तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनातून भारताच्या गरजा पूर्ण केल्यानंतर त्यांची निर्यातही केली जाईल. नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) प्लांटमध्ये भारतीय हवाई दलासाठी रशियन वंशाच्या लढाऊ विमानांची निर्मिती सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. रशियन सहकार्याने 1964 मध्ये सुरू झालेला हा प्लांट मिग-21 आणि नंतर सुखोई-30 लढाऊ विमानांच्या निर्मिती आणि देखभाल एचएएलकडून केली जात आहे. आता जागतिक निर्यातीसाठी भारत आणि रशिया सुखोई-30 विमानाची निर्मिती एचएएलमध्ये करू शकते, असे झाल्यास नाशिकचे महत्व आणखी वाढणार आहे.  


एचएएलला सुखोई बनवण्याचा मोठा अनुभव


सध्या भारतीय हवाई दलाकडे सर्वाधिक सुखोई-30 विमाने आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील करारामध्ये 272 सुखोई-30 विमानांचा करार समाविष्ट होता, ज्यापैकी HAL प्लांटमध्ये मोठ्या संख्येने सुखोई - 30 विमानाचे उत्पादन केले आहे. सुखोई-30 हे आधुनिक लढाऊ विमान आहे. जे पुढील दोन ते तीन दशकांसाठी वापरले जाईल. त्यामुळे ते भारतात बनवल्यास जागतिक निर्यातीची मागणीदेखील मागणीदेखील पूर्ण होऊ शकते. या प्लांटचा उपयोग भविष्यात रशियन मूळ विमान असलेल्या देशांच्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.


आणखी वाचा 


Narendra Modi Russia Visit : युरोप, अमेरिकेला जमलं नाही, तर मोदींनी पुतीनना तोंडावर बोलून दाखवलं! रशिया दौऱ्यात काय काय घडलं? जगाच्या पाठीवर प्रतिक्रिया उमटल्या