I.N.D.I.A Alliance Meeting : विरोधी पक्षांच्यां इंडिया आघाडीची बैठक आता 17 डिसंबरला होणार आहे. आज 6 डिसेंबरला होणारी इंडिया आघाडीची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता पुढच्या आठवड्यात होणार आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे (Michong Cyclone) इंडिया आघाडीची बुधवारी होणारी दिल्लीतील बैठक (I.N.D.I.A Alliance Meeting) रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. (Congress) होती. मात्र, विरोधी पक्षांच्या आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे.


इंडिया आघाडीची आजची बैठक रद्द


भाजप सरकार विरोधात एकत्र येत विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. पण, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांचा हिरमोड झाल्याचं म्हटलं जात आहे. या निकालातील भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालं आहे. ममता बँनर्जी आणि नितीश कुमार या बैठकीला अनुपस्थितीत राहणार नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तामिळनाडूचे स्टॅलिनही गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे ही बैठक आता 17 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. 


लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक


पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी नवी दिल्लीत 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक होणार होती. काँग्रेसने ही बैठक बोलावली असून त्यात विरोधी पक्षांचे बडे नेते सहभागी होणार होते. मात्र आता अनेक नेते उपस्थित न राहिल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला मोठे नेते उपस्थित राहू शकणार नसले तरी, त्या ठिकाणी आता एक अनौपचारिक बैठक होणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलं आहे.


इंडिया आघाडीतील घटक पक्ष नाराज 


पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला झाला. तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या हिंदी बेल्ट असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव स्वीकारावा लागला आहे.


या निवडणुकीत इंडिया आघातील घटक पक्षांना काँग्रेसने विश्वासात घेतलं नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळेच नितीश कुमार, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी नाराज आहेत. तसेच आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं. मिचॉंग चक्रीवादळामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं स्टॅलिन यांनी कळवल्याचं काँग्रेसने सांगितलं. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्यात आली आहे.