नवी दिल्ली : देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जागावाटपातबाबतही लवकरच चर्चा सुरु करणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये भाकपचे डी. राजा, सपाचे जावेद अली, कांग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे टीआर बालू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जदयूचे संजय झा, आपचे राघव चड्ढा,
पीडीपी च्या महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरंसचे ओमर अब्दुल्ला, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, झामुमोचे हेमंत सोरेन या नेत्यांचा समावेश होता.
बैठकीत ठरलेले चार महत्त्वाचे मुद्दे के सी वेणुगोपाल यांनी वाचून दाखवले. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होईल. महागाई, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यावर ही सभा होईल असंही त्यांनी जाहिर केलं. इंडिया आघाडीच्या सभेत जातीय जनगणनेचा मुद्दा देखील प्राधान्यक्रमाने घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं
जागा वाटपावर चर्चा होणार
इंडिया आघाडीमध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चितन नाही. पण आगामी काळात जागावाटपावर चर्चा होणार असल्याचं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. जागावाटपाची प्रोसेस सुरु केली आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष आपापसात चर्चा करतील आणि ठरवतील अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
आतापर्यंत इंडिया आघाडीच्या एकूण तीन बैठका झाल्या आहेत. पहिली बैठक बिहारमधील पाटना येथे झाली. त्यानंतर दुसरी बैठक ही बंगळुरुमध्ये तर तिसरी बैठक ही मुंबईमध्ये पार पडली. आता बैठकीच्या सत्रानंतर इंडिया आघाडी जाहीर सभा घेणार आहे.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये 'या' नेत्यांचा समावेश
'इंडिया' आघाडीच्या समन्वय समितीत, ज्याला निवडणूक रणनीती समिती असंही संबोधलं जातं, तिच्या सदस्यांमध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बालू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यांचा समावेश आहे. यादव, आप नेते राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंह, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि सीपीआय-एमचा एक सदस्य.
ही बातमी वाचा: