नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून केलेले भाषण हेदेखील एका वेगळ्या कारणासाठी कायम चर्चेत असते ते म्हणजे भाषणाची वेळ... 2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहे. पण चर्चा झाली ती कायम त्यांनी केलेल्या भाषणच्या वेळेची.. नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर 1 तास 28  मिनिटे  सेकंदांचे भाषण केले. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनीच सर्वाधिक लांबीचे भाषण केले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात 13 तास 40 मिनिटे भाषण केले आहे. त्यामुळे त्यांनी भाषणाचा विक्रम मोडीत काढला आहे.


2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले 94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण होतं. आजवरचं सर्वात छोटं भाषण मनमोहन सिंह यांचं 2012 मध्ये 32 मिनिटांचं होतं. देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधत नवे विक्रम केले आहेत. 2015 साली पतंप्रधान मोदी यांनी 86 मिनिटे भाषण करत जवाहरलाल नेहरूंचा  रेकॉर्ड तोडला होता. तर 2016 साली   94 मिनिटांचं भाषण हे लाल किल्ल्यावरचं आजवरचं सर्वात लांबलचक भाषण हा नवा विक्रम केला होता.  तर 2017 साली पंतप्रधानांनी आतापर्यंतचे सर्वात लहान भाषण म्हणजे 56 मिनिटांचे भाषण दिले होते.  


आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण



  • 2014 - 65 मिनिटे

  • 2015 - 86 मिनिटे

  • 2016 - 94 मिनिटे

  • 2017 -56 मिनिटे

  • 2018 - 83 मिनिटे

  • 2019 -92 मिनिटे

  • 2020  90 मिनिटे

  • 2021 -88 मिनिटे

  • 2022 - 83  मिनिटे


सलग दहा वर्षे झेंडा फडकावून देशाला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहावे पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी हे देशातील चौथे पंतप्रधान आहेत त्यांनी सलग दहा वर्षे झेंडा  फडकावून देशाला संबोधित केले आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांच्या नावावर रेकॉर्ड होता. जवाहरलाल नेहरू यांनी 17 वेळा देशाला संबोधिक केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी   72 मिनिटे इतका होता. इंदिरा गांधी यांनी 16 वेळा तर मनमोहन सिंग यांनी 10 वेळा झेंडा फडकावून देशाला संबोधित केले आहे मनमोहन सिंह यांनी दहावेळा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. त्यांच्या सर्वाधिक वेळ लांबलेल्या भाषणाचा कालावधी 50 मिनिटे इतका होता.


हे ही वाचा :                                                      


देशभरात 77 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह,  लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण, तर पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार, मोदींचं भाकित