PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi)  यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा  फडकावला.  यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांकडून विकसित भारत बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या  भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत,मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असे मोदी या वेळी म्हणाले.

  


मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या घटनेचाही भाषणात उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरसोबत आहेत. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहतील. 


भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम


भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे.  देशात अनेक ठिकाणी आज नैसर्गिक संकट आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात सर्व भारतीयांचं मोठे योगदान  आहे. गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आहे.  या घटनेचा प्रभाव पुढील 100 वर्षे असणार आहे.  भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. भारत स्टार्टअपमध्ये जगात सर्वोत्तम आहे. त्यामुळे आता आपल्याला थांबायचे नाही. आता द्विधा स्थितीत राहायचे नाही.  पुढील हजार वर्षाची दिशा निश्चित होणार आहे. तंत्रज्ञानात भारतीयांचा जगात डंका आहे.  देश प्रगतीच्या मर्गावर पुढे जात आहे. देशात आज स्वातंत्र्याचा जल्लोष आहे. 


बदलत्या जगाला भारत आकार देणार


लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे. 


कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली


 मोदींकडून लाल किल्ल्यावरील भाषणात कोरोना काळातील कामाचा उल्लेख करण्यात आले. कोरोना काळात जगाने भारताची ताकद पाहिली आहे. कोरोनानंतर जागतिक समीकरणं बदलली, आता भारताची संधी, त्यामुळे ही संधी सोडायची नाही,  असे आवाहन मोदींने केले आहे. 


 हे ही वाचा :


Mile Sur Mera Tumhara : दूरदर्शनवरील सर्वात लोकप्रिय गाणे कसे तयार झाले? वाचा 'मिले सूर मेरा तुम्हारा' गीताच्या निर्मितीची भन्नाट कथा