नवी दिल्ली: नोटाबंदीनंतर अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँकांतील खात्यांवर जमा करणाऱ्यांना आयकर खात्यानं नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे. जे जे संशयित वाटतात त्यांना या रकमेबाबत विवरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बँकेकडून पुरवण्यात आलेल्या माहितीनंतर आयकर विभागानं ही कारवाई सुरू केली. आयकर विभागाच्या नोटीसमध्ये बँकेत भरण्यात आलेल्या रकमांचं सविस्तर विवरण देण्यात आलं आहे.
त्यामुळं हजार-पाचशेच्या नोटांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना पैशांचा स्त्रोत उघड करावा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
नोटबंदीच्या निर्णयानंतर एका दिवसाला 50 हजारापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या खातेदारांची माहिती सरकारला देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेत.