गुरुवार सकाळपासून ही सुविधा सुरु झाली आहे. त्यासाठी सर्व बँकांचं सर्व्हर आयटी विभागाला जोडण्यात आलं आहे. त्यामुळे कुणाच्या खात्यात किती रोख रक्कम जमा होते, याची माहिती तातडीनं मिळते. आयकर विभागाच्या वेबसाईटवर यासाठी नवी विंडो सुरु करण्यात आली आहे.
मुंबई-दिल्लीसह काही शहरांमध्ये आयकर विभागाचे छापे
गुरुवार सकाळपासून मुंबईसह अनेक शहरात छापेमारीला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि काही इतर शहरांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत कारवाई केली आहे.
ग्राहकांकडून बँकांमध्ये भरली जाणारी रक्कम आणि त्यांच्याकडून वर्षभर बँकेत भरली जाणारी रक्कम यांचा ताळमेळ बसतो का, हे आयकर विभागाकडून तपासण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरपासूनच या पडताळणीला सुरुवात झाली आहे. 50 दिवसांपर्यत ही पडताळणी सुरु राहील.