नवी दिल्ली : परदेशात अडचणीत सापडलेल्या भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मोठा दिलासा दिला आहे. परदेशात येणाऱ्या समस्यांविषयी तुम्ही भारतीय दूतावासाला ट्टीट करा आणि त्यात मलाही टॅग करा, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


ट्विटरवर सक्रीय असलेल्या सुषमा स्वराज यांनी अडचणीत सापडलेल्या अनेक भारतीयांना मदत केली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांनी दाखवलेल्या तत्परेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

सुषमा स्वराज यांनी ट्वीट केलं आहे की, "तुमच्या अडचणी भारतीय दूतावासाला ट्वीट करुन सांगा आणि त्यात @sushmaswaraj हॅण्डललाही टॅग करा. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला याची मदत होईल."

https://twitter.com/SushmaSwaraj/status/818275934679670784

तक्रारीच्या निवाराणासाठी मी तुमच्या ट्वीटवर वैयक्तिकरित्या लक्ष देईन. आपत्कालीन परिस्थितीत कृपया #SOS हा हॅशटॅग नक्की वापरा, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं. शिवाय सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलच्या टाइमलाईनवर विविध देशातील भारतीय दूतावासांची यादीही पोस्ट केली आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/818276187847802881

सुषमा स्वराज यांनी नुकतीच 'ट्विटर सेवा'ची सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात जास्तीत जास्त भारतीय नागरिकांची मदत करता येईल, हा या सेवेमागचा उद्देश आहे. या सेवेत 198 ट्विटर अकाऊंट मदत करतील. तसंच 29 रिजनल पासपोर्ट ऑफिसची मदत घेतली जाईल.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/818276340067483648