Yogendra Yadav : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) सहाव्या टप्प्यातील मतदान आज (25 मे) होत आहे. मतदानापूर्वी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहाव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी योगेंद्र यादव यांनी आपले भाकीत जाहीर केलं आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबतचे त्यांचे अंतिम भाकीत म्हणजेच या निवडणुकांबाबतचे त्यांचे अंतिम आकलन दिले आहे. राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि विरोधी इंडिया आघाडी किती जागा जिंकणार आहे आणि देशात कोणाचे सरकार बनणार आहे? याबाबत दावा केला आहे. तसेच उत्तर प्रदेशबाबत पुन्हा एकदा दावा केला आहे.


योगेंद्र यादव यांचा अंतिम अंदाज


लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 ते 260 जागा मिळतील, असा दावा योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अंतिम अंदाजात केला आहे. योगेंद्र यादव यांच्या मते, भाजपच्या मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीत 35 ते 45 जागा मिळतील.






काँग्रेस किती जागा जिंकणार?


लोकसभा निवडणुकीसंदर्भात जारी केलेल्या त्यांच्या अंतिम भाकीतामध्ये योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकू शकते. इंडिया आघाडीच्या इतर पक्षांबाबत योगेंद्र यादव म्हणतात की ते सर्व 120 ते 135 लोकसभेच्या जागा काबीज करू शकतात.  


भाजपला तीनशेचा आकडा पार करणे कठीण


योगेंद्र यादव म्हणतात की भाजप यावेळी 272 जागांच्या खाली जाऊ शकतो. भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळू शकतात. भाजपचा 400 पार करण्याचा नारा खोटा असल्याचे सिद्ध झाले असून या निवडणुकीत भाजप 300 जागाही जिंकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधी इंडिया आघाडीबाबत योगेंद्र यादव यांनी दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीला 205 ते 235 जागा मिळू शकतात.  


'उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जागांचे नुकसान'


यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजप अनेक जागा गमावत असल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी केला. योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार, भाजपला फक्त या दोन राज्यात 10 जागा कमी पडत आहेत. येत्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात जर इंडिया आघाडी आश्चर्यकारक कामगिरी करू शकली तर ती भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएलाही मागे टाकू शकते, असेही योगेंद्र यादव म्हणाले.  योगेंद्र यादव यांनी उत्तर प्रदेशबाबत भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते की यूपीमध्ये भाजपला फक्त 40 ते 50 जागा मिळत आहेत. यावेळी भाजप यूपीमध्ये 55 जागांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. ते म्हणाले होते की भाजप यूपीमध्ये 62 जागांपर्यंत पोहोचू शकत नाही असा दावा करू शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या