ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमध्ये बीज विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने मुलाखतीवेळी नोकरीच्या बदल्यात महिला उमेदवारांकडून सेक्सची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने मेसेज करून निरोप पाठवला आणि एक रात्र घालवण्याच्या बदल्यात नोकरीची हमी दिली. महिला उमेदवाराच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने मोठी कारवाई केली. त्या अधिकाऱ्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. 


मध्य प्रदेश राज्य बियाणे आणि शेती विकास महामंडळाने सोमवारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कृषी उत्पादन अधिकारी संजीव कुमार तंतुवे यांची सेवा समाप्त केली. त्याच्यावरील आरोप खरे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. बडतर्फीच्या आदेशानुसार, तक्रारीनंतर, अधिकाऱ्यावर ग्वाल्हेर पोलिसांच्या गुन्हे शाखेने 13 जानेवारी रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 354-अ  अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपी धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली. 


नोकरीच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी


आदेशात म्हटले आहे की, 3 जानेवारी रोजी महामंडळातील एका पदासाठी मुलाखत घेतल्यानंतर आरोपीने एका महिला उमेदवाराला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून नोकरीच्या बदल्यात तिच्याकडून शारीरिक संबंधांची मागणी केली होती. बडतर्फीच्या आदेशात म्हटले आहे की, आरोपीने महिलेशी फोनवरही बोलून शारीरिक संबंधांची मागणी केली. त्यात म्हटले आहे की जर आरोप खरे ठरले तर तंतुवे यांच्या सेवा तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आल्या आहेत.


आरोपी अधिकाऱ्याने महिला उमेदवाराला तोंडी तसेच व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. याबाबत त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अधिकाऱ्याला सिवनी येथून अटक केली होती. यावेळी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याने विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याची कबुली दिली होती.


उच्च न्यायालयाच्या वकिलाने बलात्कार पीडितावर केला बलात्कार


दुसरीकडे, चार दिवसांपूर्वी केरळ पोलिसांनी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील पीजी मनूविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्याच्यावर बलात्कार पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने मनूला आत्मसमर्पण करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. 25 वर्षीय बलात्कार पीडित मुलगी 2018 मध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मनूकडे गेली होती. यानंतर मनूने महिलेवर तीन वेळा बलात्कार केला आणि अश्लील छायाचित्रेही काढली. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर आरोपी देशाबाहेर पळून जाऊ शकत नाही. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, 9 ऑक्टोबर रोजी ती महिला तिच्या आई-वडिलांसोबत कडवंथरा कार्यालयात गेली असताना आरोपीने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मनूने महिलेच्या पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले आणि पीडितेशी चर्चा करण्याच्या बहाण्याने दरवाजा बंद केला आणि खोलीत तिच्यावर बलात्कार केला.


इतर महत्वाच्या बातम्या