Weather Update : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडतोय. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (10 आणि 11 ऑगस्ट रोजी) दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, राजधानी दिल्लीत आज (गुरुवारी)  कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय 12 ऑगस्ट रोजी हवामान चांगले राहील. त्यानंतर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान दिल्लीत मेघगर्जनेसह पाऊस पडणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


उत्तर प्रदेशातही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 ते 13 ऑगस्ट दरम्यान राज्यात हलका पाऊस पडणार आहे. याशिवाय पावसाळ्यात विजा कडाडण्याची आणि पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात मान्सून सक्रिय आहे, त्यामुळे राज्यात हवामान आल्हाददायक असणार आहे.






उत्तराखंडमध्ये पावसामुळे नागरिक चिंतेत


उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) मान्सून सुरू झाल्यापासून सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने अनेक भागांत लोक नदीच्या जोरदार प्रवाहात अडकले आहेत. इतकंच नाही तर 13 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबरोबरच ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. बिहारमध्ये पावसाची सर सुरूच आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात दोन दिवसांपासून वातावरण आल्हाददायक आहे.






कोणत्या राज्यात पाऊस पडणार?


हरियाणामध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील 5 दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Bharat Dal : सवलतीच्या दरात सरकारकडून चणा डाळीची विक्री सुरु, एक किलोच्या पॅकसाठी 60 रुपये, किंमत नियंत्रणासाठी निर्णय