IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये हवामानात (Weather) बदल झाले आहेत. काही राज्यांमध्ये पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे तर, तर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. आज हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजधानी दिल्लीत हवामान चांगले असणार आहे. तर, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. याशिवाय दिल्लीचे (Delhi) कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या (IMD Weather) म्हणण्यानुसार, आज उत्तर प्रदेशात हवामान चांगले असणार आहे. याशिवाय 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राज्यात हलका पाऊस पडणार आहे. त्यानंतर संपूर्ण आठवडा हवामान स्वच्छ राहील. पावसाअभावी राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.
बिहारमध्ये तापमानात वाढ
मध्य प्रदेशात आज सकाळपासून (18 ऑगस्ट रोजी) मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय 19 आणि 20 ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. बिहारमध्ये कमी पावसामुळे तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे लोकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय.
हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, आज पुढील तीन तास राज्यात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी, 17 ऑगस्ट रोजी राज्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
'या' राज्यांमध्ये अलर्ट जारी
उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार माजला आहे. ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. विभागाने राज्यात राहणाऱ्या लोकांना सूचना दिल्या आहेत. याबरोबरच पर्यटकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बाधित भागातील लोकांना वाचविण्याचे कामही सुरू आहे.
हिमाचलमधील बियास, रावी आणि सतलज या तिन्ही प्रमुख नद्यांना गळती लागली आहे. राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय अनेकांचा मृत्यूही झाला आहे.
कुठे पाऊस पडणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय राजस्थान, कोकण आणि गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :