IMD Weather Update : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर देशभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला (Monsoon) सुरुवात झाली आहे. हवामान विभाच्या माहितीनुसार, आज (20 ऑगस्ट रोजी) राजधानी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, अंदाजानुसार, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर साधारणपणे 23 ऑगस्टच्या दरम्यान हवामानात थंडावा असेल. दिल्लीत आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.


राजस्थानमध्ये 16 ऑगस्टपासून हलक्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक आहे. येत्या काही दिवसांत पूर्व राजस्थानच्या काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. IMD नुसार राज्यात 20 आणि 21 ऑगस्ट रोजी रिमझिम पाऊस पडू शकतो. याशिवाय पुढील आठवड्याभरात वातावरणात फारसा बदल नसेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.  


डोंगराळ राज्यांमध्ये पावसामुळे विद्ध्वंस


उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहतायत. अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे डोंगराळ भागांत विद्ध्वंस झाला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत भूस्खलनाच्या घटना घडतायत. त्यामुळे अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 24 ऑगस्टपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. आज उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोमवार आणि मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यातील हवामान कुठे, कसे असेल?


गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कमी झालेला दिसतोय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागतोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओरिसामध्ये आज हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.


याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Agricultural law : वादग्रस्त कृषी कायदे करण्याची कल्पना शरद मराठेंची, द रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या अहवालातून माहिती समोर