पणजी : सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला बसला आहे. आज दुपारी अचानक झालेल्या पावसाने सगळयांचीच धांदल उडाली. या पावसामुळे इफ्फीसाठी उभारलेल मंडप जमीनदोस्त झालं. पावसामुळे सिनेमातील तारे तारकांच्यासाठी अंथरलेल्या रेड कार्पेटवर देखील पाणी फेरले. आइनॉक्स परिसरातील सजावट आणि रेड कार्पेटवर पावसाचे पाणी साचल्याने प्लास्टिक घालून झाकून ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मॅकेनिझ पॅलेस शेजारी रंगीत कापडी पताका लावून उभारलेला मंडप बघताक्षणी जमीनदोस्त झाला. झारखंड पर्यटन खात्यातर्फे उभारल्या जात असलेल्या स्टॉलला देखील प्लास्टिकने झाकावे लागले. जॉगर्स पार्क मध्ये मोकळया मैदानावर खेळाचे सिनेमे दाखवले जाणार आहेत. त्यासाठी उभारली स्क्रीन देखील पावसाने भिजून गेली आहे. इफ्फीच्या लोगोची इन्स्टॉलेशन देखील पावसामुळे झाकुन ठेवावी लागली आहेत. इफ्फीचा उद्धाटन सोहळा इनडोअर स्टेडियममध्ये होणार असल्याने आयोजकांनी मात्र सूटकेचा निःश्वास सोडला आहे. पण जर पाऊस असाच सुरु राहिला तर थिएटर बाहेर कोणतेही कार्यक्रम करणे शक्य होणार नाही.