मुंबई : ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमची ट्रेन यायला 3 तासांहून जास्त उशीर झाला आणि प्रवासी संबंधित ट्रेनमधून प्रवास करु शकला नाही तर त्या प्रवाशाला तिकीटाचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत.


ज्यांनी ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक केलं आहे, त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे. IRCTC च्या मार्फत ही पैसे परत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेली ट्रेन जर तीन तासांपेक्षा जास्त वेळ रखडली आणि त्यामुळे तुम्ही त्या ट्रेनने प्रवास केला नाहीत, तर तुम्हाला पैसे परत मिळवता येतील.

ई-तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी आयआरसीटीसीचा टीडीआर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. टीडीआर ऑप्शन सिलेक्ट केल्यावर प्रवाशाला त्याच्या तिकीटाचा पीएनआर नंबर आणि प्रवासाच्या इतर माहितीचा फॉर्म भरावा लागेल.

हा ऑनलाईन फॉर्म भरल्यावर बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज प्रवाशाला मोबाईलवर येईल.