नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्ध झालं तर पाकिस्तानच्या शस्त्रांसमोर भारताची शस्त्र ताकद किती आहे याचा अंदाज येईल. त्यामुळे भारताची ताकद ओळखूनच पाकिस्ताननं आव्हान द्यावं.. अन्यथा तीन युद्धात झालेली परिस्थिती पाकवर पुन्हा यायला वेळ येणार नाही.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सुसाट कारवाईनंतर सीमेवर तणाव आहे. त्यामुळे कधी नव्हे ते सीमेवर युद्धसदृश्य परिस्थिती उद्भवते की काय अशी अवस्था आहे. आपण आता सीमेवर काळजी घेतली पाहिजे, असं मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करतात.
पण समजा या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात युद्ध झालंच तर दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना होणारच. या तुलनेत भारताचं पारडं जड आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. फक्त अणुबॉम्बच्या संख्येमध्ये दोन्ही देश सारखेच समर्थ असले, तरी प्रत्यक्ष लढाईत भारताचा वरचष्मा आहे.
भारताचं संरक्षण बजेट हे चार हजार कोटी डॉलर आहे, तर पाकिस्तानचं संरक्षण बजेट अवघं 700 कोटी डॉलर. भारताच्या सैन्यदलात तब्बल 2 कोटी 30 लाख सैनिक आहेत, तर पाकच्या सैनिकांचा आकडा फक्त 43 लाख. त्यातले भारताचे सीमेवरचे सैनिक आहेत 13 लाख, तर पाककडे फक्त 6 लाख 20 हजार.
भारताकडे 6 हजार 500 रणगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 3 हजार. भारताच्या ताफ्यात 7 हजार 500 तोफा आहेत, तर पाकिस्तानच्या ताफ्यात अवघ्या 3 हजार तोफा. भारताकडे 300 मिसाईल्स आहेत, तर पाकिस्तानकडे 130
जमिनीवर आपण पाकिस्तानपेक्षा चौपटीने ताकदवान आहोतच. पण आकाशातही पाकिस्तान भारतासमोर ठेंगणं आहे. भारताकडे 810 लढाऊ विमानं आहेत, तर पाककडे फक्त 390. भारताकडे हल्ला करणारी 680 विमानं आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 300. भारताच्या सर्व विमानांचा आकडा हा 2 हजारांच्या घरात आहे, तर पाकिस्तानच्या ताफ्यात एकूण 900 विमानं आहेत. भारताकडे 650 हेलिकॉप्टर्स आहेत, तर पाककडे फक्त 300.
हवेतच नाही, तर समुद्रातही भारताची ताकद ही पाकिस्तानच्या उरात धडकी भरवते. भारताच्या ताफ्यात तब्बल 300 युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानच्या ताफ्यात 200. विमान वाहून नेणारी भारताकडे 2 जहाजं आहेत, तर पाकिस्तानकडे अशाप्रकारचे एकही जहाज नाही. भारताकडे तब्बल 14 पाणबुड्या आहेत, तर पाककडे फक्त 5.
1965, 1972, कारगिलसारख्या युद्धांमधून बहुदा पाकिस्ताननं धडा घेतलेला नाही... तेव्हा सीमेवरचा तणाव वाढला.. युद्धजन्य स्थिती झालीच... तर पाकिस्ताननं फक्त भारताच्या शस्त्रसज्जतेचे आकडे पाहावे... युद्धाचा निकाल आपोआप लागेल