मुंबई:  राज्यभरात आज मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने मतदान होत आहे. त्यामुळे तुम्हाला एका प्रभागातून 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.


मायानगरी मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत.

जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तरीही तुम्हाला मतदान करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्राशिवाय अन्य 17 ओळखपत्रांना मान्यता दिली आहे.

जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?

  1. आधारकार्ड

  2. पॅनकार्ड

  3. ड्रायव्हिंग लायसन्स

  4. राष्ट्रीय बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असलेले पासबुक

  5. पासपोर्ट

  6. सरकारी मान्यताप्राप्त ओळखपत्र

  7. रेशन कार्ड

  8. फोटो असलेलं क्रेडिट कार्ड

  9. स्वातंत्र्यसैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र

  10. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने अनुसूचित जाती/ जमाती/ इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागासवर्ग यांना फोटोसह दिलेले प्रमाणपत्र

  11. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याने फोटोसह ‌दिलेला अपंगत्वाचा दाखला

  12. मालमत्ता नोंदीबाबतची कागदपत्रे; तसेच नोंद निखात (फोटोसहीत)

  13. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत फोटोसहीत देण्यात आलेला शस्त्रास्त्र परवाना

  14. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच्या तारखेपर्यंत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली फोटो असलेले ओळखपत्र

  15. निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पासबुक

  16. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा अवलंबित व्यक्ती यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र,वयस्कर निवृत्ती वेतनधारक किंवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र

  17. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड ,रेशनकार्ड (कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल; तसेच जर रेशनकार्ड एकाच व्यक्तीचे नाव असेल त्याने स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पुरावा जसे वीजवापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक, प्रॉपर्टी कार्ड, किंवा घरपट्टी भरल्याची पावती बरोबर आणणे बंधनकारक राहील)