Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये खान सर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या संघर्षाची गाथा सांगितली. मुलांना कमी पैशात शिकवणं असो अथवा शिकवण्याची नवी संकल्पना, आयडिया आणि धोरण यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केले. इंग्रजी मीडियममधून हिंदी मीडियममध्ये येणं, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता. जर हिंदी मीडियमध्ये आलो नसतो तर आज माझ्याकडे काहीही नसते. शिक्षणात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही पाहिजे, असे खान सर यांनी सांगितलं. 


शिक्षणाला आम्ही अधिक इंटरेस्टिंग करतो की त्यापासून विद्यार्थी दूर जाऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, 'आम्ही गरिबी इतक्या जवळून पाहिली आहे की लोकांनी आपल्या बायकोलाही इतक्या जवळून पाहिलं नसेल.' संघर्षाच्या काळात मित्रांनी मदत केल्याचेही सांगायला खान सर विसरले नाहीत.
 
एक कंपनीने 140 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचेही यावेळी खान सर यांनी सांगितलं. पण त्यांनी ती ऑफर धुडकावली. ते म्हणाले की, मी जर 140 कोटींची ऑफर घेतली असती तर गरिबांच्या मुलांना कुणी शिकवलं असतं. जेव्हा मी टिचिंग क्षेत्रात आलो तेव्हा मला वाटलं गरिबाची मुलेही शिक्षणाचं स्वपर्न पाहू शकतात, असे वाटलं. त्यांची मदत करायला हवं असे वाटलं.


तिकिटासाठीही नव्हते पैसे - 


मला घरी जायचे होते अन् तिकिटासाठी 90 रुपये नव्हते, हा प्रसंग मी कधीच विसरु शकत नाहीत, असे खान सर म्हणाले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र दिवस होता. माझ्या आजोबांनी मला सांगितले की, 'स्वप्ने आणि इच्छा कधीच संपत नाहीत, परंतु काही गरजा असतात. पहिल्यांदा आपल्या गरजा पाहा आणि मग स्वप्नासाठी पुढे जावा.' 


 140 कोटींची ऑफर धुडकावली -


मी एक होम ट्यूशन सुरु केले, त्यानंतर एका कोचिंग सेंटरमध्ये शिकवायला गेलो. त्यावेळी मुलांची संख्या वाढली. त्यानंतर कोचिंगवाल्यांनी फी वाढवण्याचा निर्णय घेतला. याला मी विरोध केला अन् स्वत:चं कोचिंग सेंटर सुरु केले. त्यावेळी मला खूप विरोध झाला, कोचिंग सेंटरवर बॉम्बही फेकण्यात आला होता. सर्व काही संपले होते. त्यावेळी घरी जायचा विचार केला पण खिशात 90 रुपये सुद्धा नव्हते.... माझ्याकडे फक्त 40 रुपये होते, त्यामुळे मी घरीही जाऊ शकलो नाही. या संघर्षातूनच मार्ग काढला.. आज अनेकांना कमी पैशात शिकवण देतो, याचं समाधान मिळतेय, असे खान सर म्हणाले. नुकतेच एका कंपनीने 140 कोटींची ऑफर दिली होती. ती धुडकावली. कारण जर मी ती ऑफर घेतली असती तर गरिबांच्या मुलांना स्वत्तात कोण शिकवणार होतं? असा प्रश्न माझ्यासमोर उभा होता, असे खान सर म्हणाले.