Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया 2023 (Ideas of India Summit 2023) या विशेष कार्यक्रमा दरम्यान बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी देखील हजेरी लावली. या विशेष कार्यक्रमात त्यांनी चित्रपट आणि वेबसीरिजमधील त्यांच्या पात्रांविषयी सांगितले तसेच, या दोघांमध्ये नेमका समतोल ते कसा राखतात याबाबत सांगितले.
'अलिगढ' चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले...
अलिगढ चित्रपटाबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले की, "मी एक कलाकार, एक नागरिक आणि खेड्यातील एक सर्वसामान्य माणूस म्हणून पाहतोय भारतात स्वप्न पाहणं खूप कठीण आहे. माझ्या गावी पाटण्याला पोहोचायला मला खूप संघर्ष करावा लागला. तेव्हा स्वप्न पाहणं कठीण होतं. आज प्रत्येकजण स्वप्न पाहू शकतो आणि ते साध्य करू शकतो.
चित्रपटांनी OTT चं जग कसं बदलून गेलं?
या बदलत्या जॉनरबद्दल मनोज वाजपेयी म्हणाले, "जेव्हा लोक एकावेळी एकाच जॉनरचा विचार करून एक्टिव्ह होतात, तेव्हा ती गोष्ट वर्क करते. राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्या' चित्रपटात केलेले काम पाहून नव्या दिग्दर्शकाला त्याची कथा सांगण्याची एक नवीन मार्ग मिळाला. प्रत्येक 20 वर्षांनी जनरेशन बदलत जाते."
ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, "4 वर्षांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात आला पण अमेरिकेत नार्कोजसारखे शो फार चालत होते. जेव्हा नवीन संकल्पना कलेत भर घालतात तेव्हा मागणी जास्त असते आणि प्रेक्षक मागणी करत आहेत हे पाहून मला फार आनंद होतोय. प्रेक्षकांना वेगवेगळ्या माध्यमांत वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत."
मी कोणत्याही गटाशी संबंधित नाही. प्रत्येकाला आपला संघर्ष स्वत: करावा लागतो. आपल्याला कोणीही सुपरस्टार करू शकत नाही. असे कार्यक्रमाच्या दरम्यान मनोज वाजपेयी म्हणाले.
अभिनयाचा प्रवास कसा घडत गेला?
मनोज वाजपेयी म्हणाले, "जेव्हा मी थिएटर करायचो, तेव्हा मला पुस्तक शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा. आता प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे. आज माझ्या गावी एखादा मुलगा जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा तो ते सहज साध्य करू शकतो.
भोजपुरीबद्दल काय म्हणाले मनोज वाजपेयी?
ते म्हणाले, "मी माझी मातृभाषा कधीच लपवत नाही. माझ्या ठिकाणाहून मोठ्या शहरात येणाऱ्या लोकांची अडचण मला समजते, त्यांच्यासाठी ही अडचण कायम आहे. मी त्या लोकांना मुळाशी राहण्यास सांगतो."
महत्त्वाच्या बातम्या :