ABP Network Ideas of India Summit 2023 : ABP नेटवर्क समूहातर्फे येत्या 24-25 फेब्रुवारी दरम्यान आयडियाज ऑफ इंडिया समिटच्या (Ideas Of India Summit) सेकंड एडिशनचं आयोजन करण्यात येणार आहे. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता यावर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची यंदाची थिम 'नया इंडिया: लूकिंग इनवर्ड, रिचिंग आउट' अशी आहे. तर, Ola चे सह-संस्थापक आणि CEO भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) हे इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यातील योजनांबाबत मार्गदर्शन करतील. तसेच, विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. हे व्यक्ती या कार्यक्रमात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते मांडताना दिसतील.
'या' दिग्गजांची प्रमुख उपस्थिती
यावर्षी, ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट या कार्यक्रमाची सह-प्रस्तुती डाबर वैदिक टीद्वारे करण्यात आली आहे. तसेच डॉ. ऑर्थो, गॅलंट अॅडव्हान्स आणि राजेश मसाला (मारुती सुझुकी आणि टेक पार्टनर पॅनासोनिक) हे या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस, गीतकार आणि कवी जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताव घोष आणि देवदत्त पट्टनाईक, अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुप्ता आणि विनेश फोगट आणि इतर मान्यवर आपलं मत मांडणार आहेत.
Ideas of India Summit 2023 मध्ये अनेक वक्ते उपस्थित असतील. त्यापैकीच एक प्रमुख वक्ते म्हणजे Ola Electric आणि Ola Cabs चे सह-संस्थापक आणि CEO भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal). अग्रवाल यांनी जानेवारी 2011 मध्ये अंकित भाटीसह ओला कॅबचे सह-संस्थापक होण्यापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली होती. मायक्रोसॉफ्टसोबत दोन वर्षांच्या कार्यकाळात अग्रवाल यांनी दोन पेटंट दाखल केले आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये तीन शोधनिबंध प्रकाशित केले.
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेटची 7,610 कोटी ($920 दशलक्ष) गुंतवणुकीसह जगातील सर्वात मोठे EV हब स्थापन करण्याची भाविश अग्रवाल यांची योजना आहे. याआधी ऑगस्ट 2022 मध्ये, अग्रवाल यांनी घोषणा केली होती की 2024 मध्ये कंपनी एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज असलेली पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार. आता ओला इलेक्ट्रिकने 2026 पर्यंत आपल्या पहिल्या ईव्हीचे 10 लाख युनिट्स बनवण्याचं त्यांचं ध्येय आहे.
महत्त्वाच्या बातम्या :