नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी अनेक परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानेही (ICAI) सीएची परिक्षा पुढे ढकलण्यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दोन मे ते 18 मे पर्यंत असणारी परिक्षा आता 19 जून ते 4 जुलै या कालावधीत घेण्यात येतील. सीए परीक्षा नियामक मंडळाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, जवळपास सर्वच विद्यापीठांच्या परिक्षा राहिल्या आहेत. त्यामुळे त्याबद्दल काय निर्णय घेण्यात येतो ते पाहणेही महत्वाचे आहे.



फाऊंडेशन कोर्सची परीक्षा अंतिम गट II च्या परीक्षेसह 27, 29 जून आणि 1 व 3 जुलैला होणार आहे. पोस्ट पात्रता अभ्यासक्रमाची परीक्षा आयएनटीटी-एटी अंतिम गट II परिक्षेसह 27, 29 जूनला घेण्यात येणार आहे. तर, आयटीएल आणि डब्ल्यूटीओ परीक्षेचे चार पेपर्स, इंटरमीडिएट (आयपीसी) चा ग्रुप एकची परीक्षेची माहितीही अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.


Coronavirus Full Updates | देशभरात कोरोनाचा गुणाकार सुरु, राज्यात 136 कोरोनाबाधित


नवीन वेळापत्रकानुसार फाउंडेशन कोर्स परीक्षा
जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.


इंटरमीडिएट (आयपीसी) कोर्स परीक्षा (OLD SCHEME)
ग्रुप 1 : जून 20, 22, 24 आणि 26, 2020
ग्रुप 2 : जून 28, 30 आणि जुलै 2, 4, 2020.



इंटरमीडिएट कोर्स परीक्षा (NEW SCHEME)
ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 26, 2020
ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.



अंतिम कोर्स परीक्षा (OLD SCHEME)
ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 2020
ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.



अंतिम कोर्स परीक्षा (NEW SCHEME)
ग्रुप 1 : जून 19, 21, 23 25, 2020
ग्रुप 2 : जून 27, 29 आणि जुलै 1, 3, 2020.



आंतरराष्ट्रीय व्यापार कायदे व जागतिक व्यापार संघटना (आयटीएल व डब्ल्यूटीओ), भाग 1
ग्रुप 1 : जून 20, 22, 2020
ग्रुप 2 : जून 24, 26, 2020.
आंतरराष्ट्रीय कर सहाय्य चाचणी (INTT AT)
जून 27, 29, 2020