IBPS RRB Office Assistant 2017: ही पदं लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे भरण्यात येतील. लेखी परीक्षा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते. या पदांसाठी 12 जुलैपासून नोंदणी सुरु होणार आहे.
IBPS RRB Office Assistant 2017: या भरतीद्वारे ऑफिस असिस्टंटची 7374 पदं, ऑफिस स्केल-1 ची 4865 पदं, ऑफिसर स्केल-2 ची 1746 आणि ऑफिसर स्केल-3 ची 207 पदं भरण्यात येणार आहेत.
IBPS RRB Office Assistant 2017: पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. विविध पदासाठी 18 ते 40 वयाची मर्यादा आहे. पदानुसार तो तो वयोगट लागू असेल.
IBPS RRB Office Assistant 2017: सर्व पदांसाठीच्या वयोमर्यादेत एससी-एसटी उमेदवारांसाठी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आरक्षित उमेदवारांसाठी 100 रुपये तर अन्य वर्गातील उमेदवारांना 600 रुपये फी आहे.
IBPS RRB Office Assistant 2017: 12 जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार असून 1 ऑगस्ट 2017 पर्यंतची मुदत असेल. अधिक माहितीसाठी www.ibps.in या वेबसाईटला भेट द्या.