IBPS Clerk Mains Exam Results 2022: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) नं लिपिक मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाहीर झालेल्या परीक्षेचा निकाल पाहू शकतात. हा निकाल येत्या 30 तारखेपर्यंत इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.


इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन लिपिक मुख्य परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर 25 जानेवारी 2022 रोजी घेण्यात आली होती. एकूण लिपिकांच्या 7885 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा अशा विविध बँकांसह विविध बँकांमध्ये ही भरती केली जाईल. महत्वाचं म्हणजे, 1 मेनंतर निकाल पाहता येणार नाही. 


कसा पाहायचा निकाल?
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
- मुख्यपृष्ठावर दिलेल्या CRP-Clerks-XI साठी तुमचा ऑनलाइन मुख्य परीक्षेचा निकाल पहा या लिंकवर क्लिक करा.
- येथे नोंदणी क्रमांक इत्यादी टाकून सबमिट करा.
- त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.


इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक पदासाठी भरतीसाठी 2021 मध्ये अर्ज मागवले होते.  07 ऑक्टोबर 2021 पासून अर्ज प्रक्रियाला सुरुवात केली होती. तर, 27 ऑक्टोबर 2021 अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha