Navratri 2022 Special Thali : नवरात्रीच्या (Navratri 2022) काळात उपवास असताना प्रवास करणे कठीण काम असू शकते. हेच लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेने त्यांचा नवीन नवरात्री स्पेशल मेन्यू (IRCTC Navratri 2022 Special Menu) सादर केला आहे, जो सणाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात 2 एप्रिलपासून उपलब्ध होईल.
चैत्र नवरात्री दरम्यान, जो देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. या दिवसांत देवीमातेला प्रसन्न करण्यासाठी लोक नऊ दिवस उपवास करतात. अशावेळी जर, प्रवास करावा लागला तर खरंच खूप टेन्शन येतं. मात्र, प्रवाशांचा हाच विचार लक्षात घेता आता, आयआरसीटीसीने त्यांच्या मेन्यूमध्ये नवरात्री विशेष खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे, ज्याची किंमत केवळ 99 रुपयांपासून सुरु होते. पाहा काय काय असणार आहे या मेन्यूमध्ये..
स्टार्टर्स (विना कांदा-लसूण, सैधव मिठाचा वापर)
1. आलू चाप : बटाटा, खोबरं, शेगदाणे, साबुदाणा यासह हा पदार्थ तयार केला जातो. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ, उपवासासाठीदेखील चालतो.
2. साबुदाणा वडा : साबुदाणा, शेगदाणे, मिरची यांच्या मिश्रणाचा हा कुरकुरीत साबुदाणा वडा क्रीमी दह्यासोबत सर्व्ह केला जातो.
मेन कोर्स (विना कांदा-लसूण, सैधव मिठाचा वापर)
1. पनीर मखमली आणि साबुदाणा खिचडी थाळी : पनीर मखमली आणि साबुदाणा खिचडी या थाळीमध्ये साबुदाणा खिचडी, शिंगाड्याच्या पिठाचा आलू पराठा, आलू चाप, पनीर मखमली, अरबी मसाला आणि सीताफळ खीर यांचा समावेश आहे.
2. कोफ्ता करी आणि साबुदाणा खिचडी : या थाळीमध्ये साबुदाणा खिचडी, कोफ्ता करी, शिंगाड्याच्या पिठाचा आलू पराठा, आलू चाप, अरबी मसाला आणि सीताफळ खीर यांचा समावेश आहे.
3. पनीर मखमली आणि पराठा : या थाळीमध्ये शिंगाड्याच्या पिठाच्या आलू पराठ्याबरोबर पनीर मखमली आणि अरबी मसाला सर्व्ह केला जाईल.
4. साबुदाणा खिचडी आणि दही : या थाळीमध्ये सर्वांनाच आवडणारी साबुदाणा, शेंगदाणे, मिरचीपासून बनवलेली चटपटीत साबुदाणा खिचडी आणि दही मिळेल.
गोड
सीताफळ खीर : मलई आणि ताज्या सीताफळापासून बनवलेली ही क्रीमी सीताफळ खीर नक्कीच प्रत्येकाला आवडेल.
रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी 28 मार्चपासून त्यांच्या तिकिटांवर या उपवास स्पेशल थाळी बुक करू शकतात. याव्यतिरिक्त 1323 वर कॉल करून ई-कॅटरिंग सुविधा वापरू शकतात.
हेही वाचा :
- Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याविषयीच्या 'या' नवीन गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात
- Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha