मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) क्लर्क पदासाठीच्या 5830 जांगांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या जागा देशातील विविध बँकांमध्ये भरल्या जातील. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी व अर्ज करावा. तीन वेगवेगळ्या तारखांना ही परीक्षा घेण्यात येणार असून कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे CRP च्या माध्यमातून ही पदं भरली जाणार आहेत असं आयबीपीएसने स्पष्ट केलं आहे. 


या भरतीसंबंधी अधिसूचना ही रविवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनाचे सावट असतानाही 5830 पदांसाठी भरती घेण्यात येणार असल्याने या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. 


परीक्षेसंबंधी महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख- 12 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 1 ऑगस्ट 2021
पूर्व परीक्षेसंबंधी प्रशिक्षण- 16 ऑगस्ट 2021
पूर्व परीक्षेची तारीख- 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर 2021
मुख्य परीक्षेची तारीख- 31 ऑक्टोबर 2021
परीक्षेची फी- 850 रुपये


अर्ज कसा करणार? 
इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
'New Registration' यावर क्लिक करावं.
त्यानंतर आपलं नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल भरावा.
त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावं. 


गेल्या वर्षी आयबीपीएसच्या 1500 जागांसाठी भरती निघाली होती. त्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणात जागा निघाल्या आहेत. एकदा फॉर्म भरल्यानंतर परीक्षार्थींनी लेटेस्ट अपडेटसाठी सातत्याने आयबीपीएसची वेबसाईट पाहत राहणे आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या :