CASB IAF Admit Card 2021: सेंट्रल एअरमॅन सिलेक्शन बोर्डाकडून (CASB) इंडियन एअरफोर्स, IAF X, Y परीक्षांचे प्रवेशपत्र Admit Card 2021 जारी करण्यात आलं आहे. हॉल तिकिट त्याच उमेदवारांना देण्यात आलं आहे ज्यांची परीक्षा 12 जुलै रोजी होणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना IAF प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट airmenselection.cdac.in वर जाऊन आपल्या रोल नंबरच्या मदतीनं लॉगिन करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचं आहे.  

Continues below advertisement


CASB IAF Admit Card 2021 असं करा डाऊनलोड
1. अधिकृत वेबसाईट airmenselection.cdac.in वर जा


2. होमपेजवर दिसत असलेल्या कॅन्डिडेट टॅबवर क्लिक करा. 


3. नवीन पेजवर आल्यानंतर अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा


4. आता आपल्या डिटेल्स टाकून लॉगिन करा. 


5. अॅडमिट कार्ड स्‍क्रीन वर दिसेल. 


हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घ्या.


उमेदवारांना आपल्या अॅडमिट कार्डसह परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळेल. देशात वाढत्या कोरोना संसर्गामुळं IAF Group X आणि Y भरती परीक्षा आधी स्थगित करण्यात आली होती. आता  परीक्षा आयोजित करणाऱ्या प्राधिकरणाने 12 जुलै ते 18 जुलै 2021 दरम्यान परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.