हैदराबाद : हैदराबादची प्रमुख इस्लामिक शिक्षण संस्था ‘जामिया निजामिया’ने एक नवा फतवा जारी केला आहे. या फतव्याद्वारे या संस्थेने मुस्लीमांनी झिंगा खाणे टाळण्याचं सांगितलं आहे. पण या फतव्याला जमीयत-उलेमा-ए-हिंदने तीव्र विरोध दर्शवला आहे.
'जामिया निजामिया'चे प्रमुख मुफ्ती मोहम्मद अजीमुद्दीन यांनी फतव्याचं समर्थन करताना सांगितलं आहे की, “झिंगा हा प्राणी मुस्लीम समाजासाठी निषिद्ध आहे. शिवाय झिंगा हा माशाचा प्रकारच नाही. त्यामुळे ते खाणे मकरुह तहरीम (मुस्लीमांसाठी निषिद्ध गोष्टी) आहे. त्याला इस्लाममध्ये खाण्यास परवानगी नाही.”
दुसरीकडे हैदराबादच्या संस्थेच्या फतव्याला 'जमीय-उलेमा-ए- हिंद'चे मुफ्ती मोहम्मद अबरार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या फतव्यावर मुफ्ती मोहम्मद अबरार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की, “झिंग्यामध्ये रक्त नसते. तसेच झिंगा हा एक माशांचाच प्रकार आहे. त्यामुळे ते खाण्यात काहीही गैर नाही.”
विशेष म्हणजे, हैदराबादच्या इस्लामिक संस्थेच्या फतव्याचा अनेक मुस्लीम विद्यार्थांनीही विरोध दर्शवला आहे. ‘अशा प्रकारचे फतवे काढून कुणाच्याही खाण्या पिण्यावर बंधन घालू शकत नाही,’ असं मत काही मुस्लीम तरुणांनी व्यक्त केलं आहे.
सध्या भारतात झिंग्याच्या विक्रीतून 30 हजार कोटीची वार्षिक उलाढाल होते. यातील सर्वाधिक झिंगे हे निर्यात केले जातात. झिंग्याचं चवीनं सेवन करणाऱ्यांचं प्रमाण भारतातही मोठं आहे. भारतातील हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील लोक झिंगा आवडीनं खातात. पण इस्लामिक संस्थेच्या फतव्यामुळे मुस्लीम समाजातून नाराजीचा सूर उमट आहे.
दरम्यान, जामिया निजामिया ही इस्लामिक शिक्षण संस्था (मदरसा) तब्बल 142 वर्ष जुनी संस्था आहे. या संस्थेचा मदरसा दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाचा मदरसा मानला जातो.
मुस्लीमांनी झिंगा खाणे टाळावे, हैदराबादच्या इस्लामिक संस्थेचा फतवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2018 08:51 AM (IST)
हैदराबादची प्रमुख इस्लामिक शिक्षण संस्था ‘जामिया निजामिया’ने एक नवा फतवा जारी केला आहे. या फतव्याद्वारे या संस्थेने मुस्लीमांनी झिंगा खाणे टाळण्याचं सांगितलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -