हैदराबाद : महिला पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. याच व्हिडीओच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली होती. हा व्हिडीओ हैदराबादमधील एका पेट्रोलपंपाचा असून यात बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जोलू शिवा दिसत आहे.

हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सर्व देशात संतापाची लाट उसळली होती. यातील चार आरोपींना घटनेचे रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. त्यादरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलीसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. यानंतर देशातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून घटनेची चौकशी सुरु आहे.

आरोपी जोलू शिवा घटनेच्या दिवशी रात्री 12:56 वाजता पंपावर पेट्रोल खरेदीसाठी आला होता. याच व्हिडीओच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. दरम्यान, शनिवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 7 सदस्यीस शिष्टमंडळाने या भागाचा दौरा केला. यात एनएचआरसी पथकाने चट्टनपल्ली गावाला भेट दिली जिथे एन्काऊंटर झाला, ही जागा पशु वैद्य सामूहिक बलात्कार आणि हत्या झालेल्या ठिकाणापासून जवळच आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन केल्यानंतर महबूबनगर येथे ठेवलेल्या आरोपींच्या मृतदेहांचेही एनएचआरसी पथकाने निरिक्षण केले. आरोपींचे शवविच्छेदन करतानाचेही चित्रिकरण करण्यात आले आहे.
पोलीसांवर हल्ला केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल -
घटनेचे रिकंस्ट्रक्शन करण्यासाठी घेऊन गेले असताना पोलीसांवर हल्ला करुन पलायन करताना चारही आरोपी पोलीसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले. याप्रकरणी चारही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती तेलंगाणा पोलीसांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोन जनहित याचिका दाखल करत निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

न्याय म्हणजे बदला नाही - सरन्यायाधीश
न्याय म्हणजे बदला नाही, अशी प्रतिक्रिया हैदराबाद येथील बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपींच्या झालेल्या एन्काऊंटरनंतर दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही, त्याने सूडाचे रूप घेतले तर तो न्याय राहत नाही. राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरु झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत परखड मते मांडली.

संबंधित बातम्या -

काय आहे उन्नावचं बलात्कार प्रकरण, नेमकं काय घडलं?

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दिल्लीत तरुणाई आक्रमक, राजघाट ते इंडिया गेटपर्यंत कँडल मार्च

Hyderabad Encounter | हैदराबाद एन्काऊंटरमधला एक आरोपी सराईत गुन्हेगार | ABP Majha