हैदराबा : हैदराबादमध्ये माणुसकी जपणारी एक घटना घडली आहे. एका महिला पोलिसाने वेदनांनी विव्हळत असलेल्या एका महिलेची प्रसुती भरदुपारी रस्त्यावरच केली.

 

दुपारची वेळ होती. हैदराबादमधील गर्दीच्या परिसरात एक महिला भररस्त्यावर वेदनेने तडफडत होती. पोलिसांना या महिलेबाबत कळलं आणि महिला पोलिसासाह पोलिसांची पथक घडनास्थळी दाखल झालं. ही महिला गर्भवती असून प्रसुती वेदना सुरु झाल्याचं पोलिसांना समजलं. एवढचं नाही तर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.



या आणीबाणीच्या परिस्थितीत पोलिसांनी संयम बाळगला. परिसरातील शांती थिएटरसमोरच महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय पोलिसांच्या टीम घेतला. महिलेला साडीच्या मदतीने झाकलं. यानंतर महिला पोलिसाने तिच्या ट्रेनिंगचा उपयोग करुम महिलेची सुरक्षित प्रसुती केली.

 

आईची आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं कळतं. पोलिसांनी केवळ तिची प्रसुतीच केली नाही तर तिला स्वच्छ कपडेही घालून रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरही या घटनेमुळे थक्क झाले आहेत.



श्रद्धा, ज्योती, शोभा आणि दिव्या या महिला पोलिसांनी महिलेची प्रसुती केली. प्रसुती होत असताना पुरुष कॉन्स्टेबलही तिथे तैनात होते. गर्दीला रोखण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. परंतु या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे.