शिमलाः वाहनकोंडीची समस्या सोडवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने दिल्लीप्रमाणे सम-विषम फार्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिमला शहरामध्ये वाहतूककोंडीची मोठी समस्या झाली आहे, विशेषतः पर्यटनाच्या काळात वाहनकोंडीची समस्या जास्त असते, त्यामुळे प्रशासन सम-विषम फॉर्म्युला आणण्याच्या विचारात आहे.
शिमला शहरातील वाहनकोंडी सोडवण्यासाठी सम विषमचा विचार चालू आहे. यामध्ये पर्यटकांच्या गाड्यांचाही समावेश असेल. यासाठी विविध विभागाचे अधिकारी सहभाग घेतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. सी. नेगी यांनी दिली.
सम-विषमचा निर्णय लागू केल्यानंतर वाहतूकीचं नियोजन कसं असेल याबाबत चर्चा करण्यात आली आहे. पर्यटकांच्या बसेससाठी पर्यायी सुविधा आणि एकेरी रस्ता वाहतूक याबद्दलही चर्चा चालू आहे, असं नेगी म्हणाले.
शिमला शहरातील पर्यटनस्थळांचा विकास करायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे मुलभूक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, असं हिमाचलचे मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांनी सांगितलं.