काळा पैसा पांढरा कसा करायचा, 'गूगल' सर्चमध्ये गुजरात अव्वल
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 08:29 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार, पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर काळा पैसा असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचाच प्रत्यय गूगल सर्चच्या एका अहवालावरुन आला आहे. काळा पैसा पांढरा कसा करायचा म्हणजे “How to convert black money into white money” हा प्रश्न काल दिवसभरात सर्वात वेगाने सर्च करण्यात आला आहे. यामध्ये गुजरातचा पहिला क्रमांक आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या आणि हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे, असा अहवाल 'ब्लूमबर्ग'ने दिला आहे. पैसे जमा करण्याची मर्यादा किती? सरकारच्या या निर्णयानंतर बँकांमध्ये काल नागरिकांनी जुन्या नोटा जमा करण्यासाठी गर्दी केली. मात्र पैसे जमा करण्यासाठी अडीच लाखांची मर्यादा देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याच्या उत्पन्नाचा स्रोत द्यावा लागणार आहे.