मुंबई : मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. मुंबईच्या सेशन्स कोर्टाने मल्ल्या यांना फरार घोषित केलं आहे. सोबत मल्ल्यांची संपत्ती, शेअर्स आणि डिबेंचर्स जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.
मुंबई हायकोर्टाने यापूर्वीच मल्ल्या यांना फरार घोषित केलं आहे. सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करत मल्ल्यांच्या देश-विदेशातील संपत्तीची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे यांना भारताने मल्ल्यासह इतर 60 'वाँटेड' गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्यास सांगितलं होतं. भारत आणि ब्रिटनमध्ये केंद्रीय गृहसचिवांच्या स्तरावर झालेल्या चर्चेत याबाबत सहमती झाली होती. दहशतवाद, व्हिसा, संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
विजय माल्लाने स्टेट बँक ऑफ इंडियासह 17 बँकांचं जवळपास 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे.