इंदूरमध्ये हॉटेलची इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Apr 2018 07:44 AM (IST)
इंदूरमधील सरवटे बस स्थानक परिसरात एमएस हॉटेलची तीनमजली इमारत कोसळली
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका हॉटेलची जुनी इमारत कोसळली. यामध्ये दहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेल्याची शक्यता आहे. इंदूरमधील सरवटे बस स्थानक परिसरात एमएस हॉटेलची तीनमजली इमारत होती. एक कार इमारतीवर आदळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. आतापर्यंत दहा जणांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. हॉटेल मॅनेजर हरीशचे 70 वर्षीय वडील गणेश सोनी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. कोसळलेली इमारत 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली होती का, याचा तपास जिल्हा प्रशासन करत आहे.