आयआरसीटीसीकडून जुनी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून कटरा स्टेशनपर्यंत या कोचचा वापर केला जाणार आहे. जम्मू मेल या ट्रेनला या शाही सलून कोचला जोडलं जाणार आहे. या कोचमध्ये 6 जणांना एकाचवेळी प्रवास करता येणार आहे.
या कोचमध्ये दोन आलिशान वातानुकुलित बेडरुम असतील. तसंच बाथरुमही जोडलेलं असेल. तसंच एक मोठी लिव्हिंग कम डायनिंग रुमही असेल.
या आलिशान सलून कोचचं भाडं जवळपास 2 लाख असेल. या कोचमध्ये प्रवाशांची काळजी घेण्यासाठी विशेष कर्मचारी वर्गही असेल. यात एक एसी एटेंडंट आणि एक सलून अटेंडंट प्रवाशांच्या दिमतीला हजर असतील.
जुनी दिल्ली स्टेशनवरुन कटरासाठी निघालेला हा सलून कोच चार दिवसांची सफर प्रवाशांना घडवून परत दिल्लीत दाखल होईल.
भारतीय रेल्वेकडे सर्व विभागांमध्ये एकूण 336 सलून कोच आहेत. यापैकी 62 कोच वातानुकुलित आहे.
पाहा माझाचा स्पेशल रिपोर्ट :