नवी दिल्ली: काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर रविद्रनाथ टागोरांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. आता त्या आरोपाला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलंय. रविंद्रनाथ टागोरांच्या खुर्चीवर मी नाही तर नेहरु बसले होते असे अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बंगालमधील शांतीनिकेतनच्या दौऱ्यावरुन अधीर रंजन दास यांनी त्यांच्यावर आरोप केला होता.


गृहमंत्री अमित शाह इतिहासाचा दाखला देत म्हणाले की, "मी कधीही रविंद्रनाथ टागोरांच्या खुर्चीवर बसलो नव्हतो. मी त्या खिडकीपाशी बसलो होतो ज्या ठिकाणी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रतिभा पाटील आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान बसले होते."


मी टागोरांचा अपमान केला ही गोष्ट चुकीची आहे असं सांगत चुकीचा आरोप करणे ही काँग्रेसची मानसिकता असल्याचा आरोप अमित शाहंनी केला. या दरम्यान त्यांनी शातीनिकेतनच्या कुलपतींच्या स्पष्टीकरणाचा दाखला दिला. तसेच बंगालच्या दौऱ्यातील फोटोच्या हवाल्याने आपल्यावरील आरोप चुकीचे आहेत असं सांगितलं.


देशाची प्राथमिकता संसदेची नवी इमारत नसून सुसज्ज असं सार्वजनिक हॉस्पिटल असायला हवं: डॉ. अमोल कोल्हे


त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि राजीव गांधी यांचेही काही फोटो संसदेत दाखवले. अमित शाह यांनी असा दावा केला की हे दोन नेते रविंद्रनाथ टागोरांच्या सोफ्यावर बसले होते. तसेच सोशल मीडियाच्या हवाल्याने काँग्रेसकडून काहीही चुकीच्या गोष्टी संसदेत बोलल्या जातात असा आरोपही अधीर रंजन यांच्यावर केला.


उत्तराखंडच्या परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर
उत्तराखंडमध्ये जी आपत्ती आली आहे त्यावर पंतप्रधानांचे लक्ष असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. तसेच या गृहमंत्रालयही या घटनेवर चोवीस तास लक्ष ठेऊन आहे आणि उत्तराखंडला सर्व काही मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात येईल असेही अमित शाह म्हणाले. उत्तराखंडमध्ये बेपत्ता लोकांच्या बचावासाठी युद्धपातळीवर काम सुरु असल्याचं सांगत त्यांनी मृतांच्या परिवाराला राज्य सरकार तर्फे प्रत्येकी चार लाखांची मदत केल्याचं सांगितंल आहे.


Video | 'राज्यसभा छोडके जा रहे है गुलाम नबी, हम मिलते रहेंगे आपको कभी कभी'; आठवलेंच्या कवितेनं राज्यसभेत हास्यजत्रा