नवी दिल्ली : अर्थसंकल्पातील तरतुदी आणि नोटाबंदी यामुळे सप्टेंबर 2017 पर्यंत लेंडिंग रेटमध्ये बँका 50 ते 75 बेसिस पॉईंटने कपात करु शकतात, असं एका अहवालात म्हटलं आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, तुमची दरमहा बचत किती?


 


अर्थसंकल्पामध्ये काही ठोस तरतुदी केल्यास नोटाबंदीमुळे कर्जाचे दर कमी करण्यास मदत होईल, असा अंदाज लावला होता. आणि त्याप्रमाणे अर्थसंकल्पात बँकांना अपेक्षित काही निर्णय घेण्यात आल्यामुळे या वर्षात सप्टेंबरपर्यंत लेंडिंग रेट 50 ते 75 बेसिस पॉईंटने कमी होतील, असा दावा बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने एका अहवालात केला आहे.

नोटाबंदीने देशाला काय दिलं? अर्थसंकल्पातील 7 निर्णय


 

जेटलींनी अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तुटीचं लक्ष्य 3.5 टक्क्यांवरुन 3.2 टक्के केलं आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 8 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या पतधोरणात दर कमी केले जाऊ शकतात, असंही बँक ऑफ अमेरिकेने म्हटलं आहे.

बजेटमधील तुमच्या फायद्याच्या 10 महत्वाच्या गोष्टी


 

नोटाबंदीनंतर व्याजाचे दर कमी होतील, असा अंदाज लावला जात असतानाच आरबीआयने 7 डिसेंबरला सादर केलेल्या पतधोरणात व्याजाच्या दरात कुठलाही बदल केला नव्हता. त्यामुळे 8 फेब्रुवारीला सादर केल्या जाणाऱ्या पतधोरणात व्याजाच्या दरात बदल केला जाईल, असा अंदाज लावला जात आहे.

3 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त, 3 ते 5 लाखाच्या टप्प्यात 50% कपात


 

पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्या 31 डिसेंबरच्या भाषणानंतर बँकांना स्वतःहून लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आरबीआयने आता दिलासा दिल्यास एप्रिल ते सप्टेंबर या काळात गृहकर्जाचे दर कमी होतील, असं बँक ऑफ अमेरिकेने म्हटलं आहे.

अर्थसंकल्पामुळे काय महाग, काय स्वस्त?


संबंधित बातम्या :

HDFC च्या कर्जावरील व्याज दरात कपात


गृहकर्जदरातील कपातीमुळे EMI कमी होणार नाहीत, तर...


बँकांकडून नवीन वर्षाचं गिफ्ट, व्याजदरात मोठी कपात