न्यूयॉर्क : हॉलिवूडचा अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रिओने तामिळनाडूमधील पाणीसंकटावर चिंता व्यक्त केली आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथील पाणीसंकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जागतिक पातळीवर देखील मुद्दा आता उपस्थित होऊ लागला आहे.


लियोनार्डोने इन्स्टाग्रामवर 'बीबीसी'ची एक बातमी शेअर केली आहे. 'केवळ पाऊस आता चेन्नईला या परिस्थितीतून वाचवू शकतो', असं या बातमीचं शिर्षक आहे.





याविषयी लियोनार्डो लिहितो की, "एक विहीर पूर्णपणे रिकामी आणि पाण्याविना एक शहर. चार प्रमुख जलाशये पूर्णपणे सुखले आहेत. दक्षिण भारतातील चेन्नई शहर जलसंकटात आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शहरात मदतीची आवश्यकता आहे. रहिवाशांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी त्यांना कित्येक तास रांगेत उभं राहावं लागत आहे."


"पाण्याच्या टंचाईमुळे हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद आहेत. शहरातील मेट्रोमधील एसी सेवाही बंद करण्यात आली आहे. लोक पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करत आहे", असं लियोनार्डोने म्हटलं आहे.



व्हिडीओ | एक कोटी लोकसंख्येच्या चेन्नई शहरात भीषण दुष्काळ | स्पेशल रिपोर्ट