Holi 2022 : भारत देशातील विविध भागात विविध संस्कृती जपली जाते. येथे सणांनाही फार महत्त्व आहे. येथील प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा केला जातो. इतर सणांप्रमाणे होळीच्या सणाला देखील तितकंच महत्व आहे. आज देशभर होळी उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय नेतेमंडळींपासून सेलीब्रेटीही आज होळी साजरी करत आहेत. देशातील सर्वच राज्यात होळी साजरी केली जात आहे. 






महाराष्ट्रातील विविध भागात आज होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यातील बीडमध्ये आजच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. तर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे रंगाविना धुळीवंदन सोहळा साजरा केला जातो. येथील नागरिक रंगांची उधळण नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करीत आहेत. तर पुण्यात मुले वॉटर गनने एकमेकांना रंग लावून होळी खेळतात. 






हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी त्यांच्या शिमला येथील निवासस्थानी होळी साजरी केली आहे. यावेळी या उत्सवात असंख्य लोक सहभागी झाले होते. 






उत्तर प्रदेशमध्येही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मोख्या संख्येने लोक एकत्र जमा होऊन होळीचा आनंद साजरा करत आहेत. लोक गाण्यांच्या तालावर बेभान होऊन नृत्य करत आहेत.  






आसाममधील गुवाहाटीमध्ये नागरिकांनी गाण्यांच्या तालावर नाचत रंगांची उधळण केली. पाणी पुवठा करण्याच्या टॅंकरध्ये रंग करून टॅंकरच्या पाईपने लोकांवर रंगाचा वर्षाव केला जात आहे.






आंध्र प्रदेश मधील विजयवाड्यात लहान मुलांसह नागरिकांनी रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी केली आहे. 






 हैदराबादमध्ये नागरिकांनी रंग, गुलाल आणि टोमॅटोने होळी साजरी केली. यावेळी लोकांनी एकमेकांना टोमॅटो फेकून मारत आनंद साजरा केला. 






राजस्थानमध्ये पर्यटक आणि स्थानिक लोक रंग आणि गुलाल एकमेकांना लावून होळी खेळतात. हजारो लोकांनी एकत्र येत रंग उधळून होळी साजरी केली. 






जम्मू आणि काश्मीरमधील जिल्ह्यातील दुर्गम भागात भारतीय लष्कराच्या जवानांसोबत स्थानिक लोक नाचून होळी साजरी करतात. बोनियार आणि बारामुल्लामध्येही स्थानिक लोक जवानांसोबत होळी साजरी करतात. 






काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी दिल्लीत होळी साजरी केली. यावेळी ते म्हणाले,  "कुटुंबाप्रमाणे काम केल्यानंतर पक्ष बळकट होतो. कुटुंबात समता आणि न्याय असतो. तर कुटुंबात ज्येष्ठांचा आदर केला जातो आणि तरुणांवर प्रेम केले जाते. पक्ष कार्यकर्त्यांना नेतृत्वाने आपले मानले पाहिजे"