नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसुफला एनआयएने राजधानी दिल्लीतून अटक केली आहे. सय्यदला 2011 मधील एका दहशतवादी संघटनेला फंडिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
एनआयएने 2011 मधील एका प्रकरणाच्या सय्यद शाहिद युसुफला चौकशीसाठी बोलावलं होतं. शाहिद युसुफ विरोधात समन्सही जारी करण्यात आला होता.
कोण आहे सय्यद सलाउद्दीन ?
सय्यद सलाउद्दीन हा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या सय्यदच्या संघटनेने काश्मीरसह संपूर्ण देशभरात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.
एप्रिल 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी सय्यद सलाउद्दीनच्या संघटनेनं घेतली होती. या हल्ल्यात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला होता.
हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला दिल्लीतून अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2017 02:49 PM (IST)
हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसुफला एनआयएने राजधानी दिल्लीतून अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -