नवी दिल्ली  : भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या संध्याकाळी बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या बैठकीत समावेश असेल. याच बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील मुख्यंमत्रिपदाचा निर्णय होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले.

https://twitter.com/AmitShah/status/840458913153667072

मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनणार नाही. माझ्याकडे बरंच काम आहे आणि मी उत्तरप्रदेशचा मतदार देखील नाही, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

मायावती यांच्या ईव्हीएमबाबतच्या आरोपांवर अमित शाह यांनी बोलणं टाळलं. मात्र, हिंदू-मुस्लीम यातून बाहेर पडा, मतदार हा मतदारच असतो. सगळ्या देशातला गरीब वर्ग मोदींच्या विविध योजनांमुळे जोडला गेलाय, त्याला जात-धर्म-पंथ या नजरेतून पाहणं सोडून द्या, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

https://twitter.com/AmitShah/status/840458545522851840

जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार या सगळ्याला मतदारांंनीच चोख प्रत्युत्तर दिल्याचं निकालातून दिसतंय. अमेठी,रायबरेलीत १० पैकी ६ जागांवर भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे, असेही अमित शाह म्हणाले.