'शांतीसाठी सशस्त्र बंधूत्व' (Brothers-in-arms for peace) अशा कॅप्शनसह हा फोटो सीआरपीएफच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आला आहे. ऑन ड्युटी असताना नमाज अदा करणाऱ्या
मुस्लिम अधिकाऱ्याच्या रक्षणार्थ दुसरा ऑफिसर उभा आहे.
काश्मिरचं खोरं धार्मिकतेच्या नावाखाली सतत धगधगतं राहिलं आहे. त्यातच सीआरपीएफच्या जवानांचा हा अनोखा बंधुत्ववाद सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.
https://twitter.com/crpf_srinagar/status/891268906643574784