शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाने सर्व्हे केला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील जनतेचं मत जाणून घेण्यात आलं. 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या काळात 68 मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार, भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काँग्रेस सत्ता गमावण्याची चिन्ह आहेत. कारण 49 टक्के जनतेचा भाजपकडे कल आहे. तर केवळ 38 टक्के जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात निवडणूक होणार आहे. कुणाला किती मतं?
  • भाजप – 49 टक्के
  • काँग्रेस – 38 टक्के
  • इतर – 13 टक्के
कुणाला किती जागा?
  • भाजप – 43-47 जागा
  • काँग्रेस – 21-25 जागा
  • इतर – 0-2 जागा
मुख्यमंत्री कोण हवा?
  • वीरभद्र सिंह (काँग्रेस) – 31 टक्के
  • जेपी नड्डा (भाजप) – 24 टक्के
  • प्रेम कुमार धुमल (भाजप) – 16 टक्के
  • अनुराग ठाकूर (भाजप) – 9 टक्के
  • शांता कुमार (भाजप) – 9 टक्के
निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा कोणता?
  • विकास – 82 टक्के
  • रोजगार – 7 क्के
  • रस्ते – 4 टक्के
  • मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार – 3 टक्के
जीएसटीमुळे समाधानी?
  • हो – 55 टक्के
  • नाही – 32 टक्के
  • सांगू शकत नाही – 13 टक्के
नोटाबंदीचा फायदा झाला?
  • हो – 59 टक्के
  • नाही – 27 टक्के
  • सांगू शकत नाही – 14 टक्के
पंतप्रधान म्हणून मोदींचं काम कसं आहे?
  • खुप चांगलं – 22 टक्के
  • चांगलं – 48 टक्के
  • वाईट – 18 टक्के
  • खुप वाईट – 12 टक्के
हिमाचल प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती
  • चांगली – 57 टक्के
  • वाईट – 40 टक्के
  • माहित नाही – 3 टक्के
संबंधित बातम्या :

सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी

गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन