Himachal Pradesh Chakki Bridge News : हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कांगडा जिल्ह्यात (Kangra District) आज (शनिवारी) सकाळी पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवरील 800 मीटर लांबीचा रेल्वे पूल कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, चक्की नदीला अचानक आलेल्या पुरामुळे पुलाचे कमकुवत खांब वाहून गेले आहेत. या पुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने काही हालचाल नसताना हा पूल तुटला त्यामुळे मोठी हानी टळली आहे. 


पाहा व्हिडीओ : 






90 वर्ष जुना पूल


मिळालेल्या माहितीनुसार, चक्की नदीला अचानक आलेल्या पुरामुळे रेल्वे पुलाचे खांब खिळखिळे झाले होते आणि त्यामुळे हा पूल कोसळला. सुदैवाने हा पूल कोसळला तेव्हा यावर कोणीही नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पुलाचे बांधकाम होईपर्यंत पठाणकोठ ते जोगिंदरनगर दरम्यान नॅरोगेज रेल्वे सेवा बंद राहणार आहे. 1928 मध्ये ब्रिटिशांनी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू केला. या पुलावरून 7 रेल्वे गाड्या धावत होत्या.


अवैध उत्खननामुळे खांब कमकुवत 


नदीपात्रात अवैध उत्खनन केल्याने 90 वर्ष जुना रेल्वे पूल कमकुवत झाला होता. बेकायदा उत्खननामुळे पुलाचे नुकसान झाल्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. गेल्या महिन्यात पुलाच्या एका खांबाला तडे गेल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.  दरम्यान, कांगडा जिल्ह्यातील बहुतेक नद्यांना गळती लागली आहे, अनेक रस्ते अडवले गेले आहेत तसेच, सार्वजनिक आणि खाजगी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.


मुसळधार पावसाचा इशारा


या सगळ्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कांगडा, चंबा, बिलासपूर, सिरमौर आणि मंडी या पाच जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंडी जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे काही गावकरी तेथे अडकले आणि अनेक वाहनांचेही नुकसान झाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी सांगितले की, कांगडा, चंबा, मंडी, कुल्लू, शिमला, सिरमौर, सोलन, हमीरपूर, उना आणि बिलासपूर जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस पाऊस सुरू राहील आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाड वर्तवला जात आहे. कुल्लूमध्येही मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती असून येथील सर्व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तराखंडमध्ये सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पुराचा धोका वाढला आहे.


महत्वाच्या बातम्या :