Himachal Rajya Sabha Election Result : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असूनही सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे काँग्रेसचे निष्ठावंत अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांना पराभवाचा धक्का बसला. त्या ठिकाणी भाजपच्या हर्ष महाजन यांनी बाजी मारली. दोन्ही उमेदवारांना समसमान मतं म्हणजे प्रत्येकी 34 मतं मिळाल्यानंतर ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून भाजपचा उमेदवार जिंकला. काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर आता त्या ठिकाणचे सुखविंदर सिंग सुखू यांचे सरकारही अल्पमतात आल्याचं स्पष्ट झालंय. 


भाजप उमेदवार हर्ष महाजन हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या जागेवर विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंधवी यांचा पराभव केला. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 


 






सुखविंदर सिंग सुखू सरकार अल्पमत


हर्ष महाजन यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर आता सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा भाजपने केला आहे. हिमाचलच्या शिमला येथे मंगळवारी सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये सर्व 68 आमदारांनी मतदान केले. मतदानानंतर आता सहा आमदार फुटल्याने काँग्रेससमोरील चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे आता भाजप काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणार का हे पाहावं लागेल.


भाजपने आमदारांचे अपहरण केले, मुख्यमंत्री सखू यांचा आरोप


मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, विधानसभेत आमचे 40 आमदार आहेत आणि भाजपने घोडेबाजार केला नसता तर सर्व मते आम्हाला मिळाली असती. भाजपने काँग्रेसच्या सहा आमदारांचे अपहरण केल्याचा आरोपही त्यांनी केला.


 






ही बातमी वाचा :