मुंबई : भारतात विवाहासंदर्भात अनेक परंपरा आणि रूढी प्रचलित आहेत. काही परंपरा सर्वसामान्यांना परिचित असतात, तर काहींच्यामुळे समाजात कुतूहल आणि चर्चेला उधाण येतं. अशाच परंपरांपैकी एका गावात प्रचलित असलेली ‘दोन लग्नांची’ प्रथा सध्या चर्चेत आहे. या परंपरेत दोन लग्न म्हणजे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणं असा प्रकार नाही. इथे एका महिलेला एकाच वेळी दोन नवरे असतात. ती त्यांच्यासोबत एकत्र राहते आणि दोघांचीही काळजी घेते. विशेष म्हणजे या प्रथेला कोणत्याही नवऱ्याची हरकत नसते. उलट दोघेही आनंदाने या विवाहबंधनात (Himachal Bride Who Married Two Brothers) सहभागी होतात. काही दिवसांपूर्वीपासून हिमाचल प्रदेशातील (Himachal Bride Who Married Two Brothers) सिरमौर जिल्ह्यातील घडलेली एक घटना सध्या चर्चेत आली आहे. जिल्ह्यातील शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन भावांनी १३ जुलै रोजी सुनीता नावाच्या एका वधूसोबत एकाच वेळी विवाह केला. या परंपरेला "जोडीदार प्रथा" असे म्हटले जाते. हिमाचल आणि उत्तराखंडातील काही समुदायांत ही प्रथा अद्यापही प्रचलित असल्याचे दिसून येते. या नवील लग्न झालेल्या जोडप्यांचे फोटो सोशल मिडीयावरती चांगलेच चर्चेत आले होते.(Himachal Bride Who Married Two Brothers)
Himachal Bride: मिस यू बोथ ऑफ माय पार्टनर्स अँड लव यू!
या परंपरेत एका कुटुंबातील सर्व भावांचे लग्न एका मुलीशी लावले जाते. काही वेळा एका मुलीचे पाच भावांशीही विवाह होऊ शकतात. या प्रथेला “पांचली प्रथा” असे संबोधले जाते. अशाच विवाहामुळे नेगी बंधू देशभरात चर्चेचा विषय ठरले. सुरुवातीला त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.काही दिवसांनंतर कपिल नेगी परदेशात नोकरीसाठी बहरीनला रवाना झाला. त्याने सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती शेअर केली. त्यावर भाऊ प्रदीपने भावनिक पोस्ट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या. “भाई, लहानपणापासून आजवरच्या सर्व आठवणी तुझ्याशी जोडलेल्या आहेत. तुझ्याशिवाय घर ओसाड वाटतंय. लवकर परत ये…” अशा शब्दांत त्याने आपल्या भावनिक भावना मांडल्या. त्याचबरोबर पत्नी सुनीता हिने देखील सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे, “नवीन गोष्टी चांगल्या वाटतात, पण जुन्या आठवणी नेहमीच सर्वात सुंदर असतात. मिस यू बोथ ऑफ माय पार्टनर्स अँड लव यू!” तिच्या या भावनिक पोस्टनंतर नेगी बंधूंच्या विवाहाची चर्चा पुन्हा एकदा चांगलीच रंगली.
Himachal Bride: पिढ्यान्पिढ्या चालत आलेली प्रथा
अलीकडेच प्रदीप आणि कपिल यांच्या आयुष्यात दुःखद घटना घडली होती. त्यांचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते आणि गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. त्यावेळीही या दोन्ही भावांनी सोशल मीडियावरून आपलं दु:ख मांडलं होतं. सिरमौर जिल्ह्यातील हाटी समाजात “जोडीदार प्रथा” पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. एका स्त्रीचं एका कुटुंबातील सर्व भावांशी लग्न केल्याने मालमत्ता, शेती आणि कुटुंबातील एकोपा टिकतो, असा समाजातील मोठ्यांचा विश्वास आहे. मात्र आधुनिक काळात या प्रथेवर अनेकदा प्रश्नचिन्हं उपस्थित होतात. तरीही नेगी बंधूंच्या विवाहामुळे ही परंपरा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.