High Priority Train: कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रेल्वेची (Railway) भूमिका खूप महत्त्वाची असते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतही भारतीय रेल्वेचा मोठा वाटा आहे. भारतीय रेल्वेतून दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. रेल्वेच्या माध्यमातून लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात पोहोचतात. ट्रेन हा प्रवासाच्या इतर साधनांपेक्षा खूपच स्वस्त पर्याय आहे.
आजच्या काळात भारतीय रेल्वे दररोज हजारो गाड्या चालवत आहे. कालांतराने रेल्वे गाड्यांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांमध्येही बरेच बदल झाले आहेत. भारतीय रेल्वेने रुळांमध्ये सुधारणा करून गाड्यांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रेल्वेकडून अनेक प्रिमियम गाड्याही चालवण्यात येतात. यामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस, देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाणारी गतिमान एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि इतर अनेक सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
या ट्रेनला मार्ग देण्यासाठी सुपरफास्ट ट्रेनलाही थांबवतात
राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) आणि जनशताब्दी एक्सप्रेसला (Janshatabdi Express) मार्ग देण्यासाठी इतर रेल्वे गाड्यांना थांबवलं जातं, हे तर तुम्हाला माहितीच असेल. पण भारतात एक अशीही ट्रेन आहे, जिच्यासाठी अगदी प्रवासी लोकलपासून ते आलिशान एक्सप्रेस गाड्यांपर्यंत मार्गावरील सर्व गाड्यांना थांबावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे का?
तर होय, भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये अशी एक ट्रेन देखील आहे, जिला मार्ग देण्यासाठी जनशताब्दी, राजधानीसारख्या प्रीमियम ट्रेन्सला देखील थांबवलं जातं. या ट्रेनचं नाव आहे- अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट (Accident Relief Medical Equipment), रेल्वे अपघातात याचा वापर केला जातो. अपघातग्रस्त स्थळांपर्यंत मेडिकल सुविधा पोहोचवण्यासाठी या ट्रेनचा वापर केला जातो. अॅक्सिडेंट रिलीफ मेडिकल इक्विपमेंट ही लाल रंगाची ट्रेन असते, जी रुळावरुन धावत असताना मागच्या आणि पुढच्या सर्व रेल्वे गाड्यांना सिग्नल दिला जातो आणि त्या थांबवल्या जातात.
राष्ट्रपतींच्या गाडीला दिला जातो रस्ता
भारताचे राष्ट्रपती जर कुठे ट्रेनने जात असतील, तर त्यांच्या ट्रेनला रस्ता देण्यासाठी सर्व गाड्या थांबवल्या जातात. मात्र, आजच्या काळात राष्ट्रपती हे क्वचितच रेल्वेने प्रवास करतात.
हेही वाचा: